नवी दिल्ली – न्यायालयाच्या अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठावला आहे. १५ सप्टेंबरपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना तीन महिन्याचा तुरुंगवास आणि तीन वर्ष वकिली करता येणार नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. १ रुपयाचा हा दंड प्रतिकात्मक आहे. त्यामुळे भूषण आता दंड भरणार की नाही या विषयावर आता चर्चा सुरु झाली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाणे ही शिक्षा सुनावली आहे. या खंडपीठात न्यायमूर्ती बी.आर. गवई व न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचा समावेश होता.