नाशिक – शहरासह जिल्ह्यात बुधवार (१६ सप्टेंबर) हा ऐतिहासिक ठरला. त्यामुळेच दिवसभरात तब्बल २ हजार ४८ जण नवे कोरोनाबाधित झाले. ही आजवरची सर्वाधिक संख्या आहे. तर, एकाच दिवसात सर्वाधिक बरेही बुधवारीच झाले आहेत. ही संख्या १ हजार ७२५ एवढी आहे. गेल्या २४ तासात एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ५७ हजार ९८८ झाली आहे. ४६ हजार ४०५ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १०७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर सध्या १० हजार ४७६ जण उपचार घेत आहेत.
बुधवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक १३०५, ग्रामीण भागातील ६७०, मालेगाव शहरातील ४० तर जिल्ह्याबाहेरील ३३ जणांचा समावेश आहे. तर, १६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ६, मालेगाव शहरातील १ आणि ग्रामीण भागातील ९ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३९ हजार ७१४. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार १४५. पूर्णपणे बरे झालेले – ३२ हजार ९००. एकूण मृत्यू – ६१४. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६ हजार २००. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८२.८४.
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १४ हजार ६८०. पूर्णपणे बरे झालेले – १० हजार ८००. एकूण मृत्यू – ३३४.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५४६. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७३.५७.
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार २६६. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ४७५. एकूण मृत्यू – १३३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ६५८. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.७८
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी