रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक – कारच्या धडकेत तरूण ठार, मामे बहिण जखमी

by India Darpan
नोव्हेंबर 18, 2020 | 10:39 am
in क्राईम डायरी
0
accident 2

कारच्या धडकेत तरूण ठार, मामे बहिण जखमी

नाशिक : भरधाव कारने धडक दिल्याने तरूण ठार झाला. हा अपघात मखमलाबाद रोडवरील ड्रिम कॅसल सिग्नल भागात झाला. या अपघातात मृताचे मामे बहिण जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षल संतोष जोशी (२२ रा.जगताप मळा,ना.रोड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार हर्षल जोशी सोमवारी (दि.१६) भाऊबिज निमीत्त हनुमानवाडी भागातील राका लॉन्स नजीक राहणा-या आपल्या मामाकडे आलेला होता.  निशीगंंधा दीपक कुलकर्णी (रा.राका लॉन्स,हनुमानवाडी) या मामे बहिणीस सोबत घेवून तो मामाच्या घरी जात असतांना हा अपघात झाला. ड्रिम कॅसल सिग्नल भागातून दोघे भाऊ बहिण रस्त्याने पायी जात असतांना बेकरी समोर पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १५ इएक्स १४२२ या कारने दोघांना धडक दिली. कारसह चालकाने पोबारा केल्याने परिसरातील नागरीकांच्या मदतीने कुटूबियांनी दोघांना रूग्णालयात दाखल केले असता हर्षल जोशी या तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर निशीगंधाची प्रकृर्तीही गंभीर आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चोपडे करीत आहेत. ……

अज्ञात वाहनाच्या धडकेत वृध्द ठार
नाशिक : भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ८५ वर्षीय वृध्दाचा मृत्यु झाला. पादचारी वृध्द रस्ता ओलांडत असतांना अज्ञात वाहनाने त्यास धडक दिली होती. हा अपघात आकाशवाणी टॉवर परिसरात झाला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसंत केशव महादेवकर (रा. चौतन्य नगर,गंगापूररोड) असे अपघातात ठार झालेल्या वृध्दाचे नाव आहे. महादेवकर मंगळवारी (दि.१७) रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी नेहमी प्रमाणे आकाशवाणी टॉवर परिसरातील जॉगींग ट्रॅक येथे गेले असता ही घटना घडली. घराकडे जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात महादेवकर गंभीर जखमी झाल्याने कुटूंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.

……
रेडक्रॉस भागात एकावर कोयत्याने वार
नाशिक : शिवीगाळ करीत एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना रेडक्रॉस भागात घडली. इमारतीच्या जिन्यात हा हल्ला करण्यात आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका वृध्दाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन धनजी रेपर (रा.आंबेडकर कॉलनी,रेडक्रॉस) असे हल्ला करणा-या संशयीताचे नाव असून या घटनेत नरेश मकवाना (४१ रा.सदर) हे जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयीत आणि जखमी एकाच इमारतीत राहणारे असून पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मकवाना मंगळवारी (दि.१७) इमारतीच्या तिस-या मजल्यावर जात असतांना ही घटना घडली. जिन्यातून जात असतांना संशयीताने त्यास गाठून विनाकारण शिवीगाळ केली. यावेळी मकवाना यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयीताने घरातील कोयता काढून त्यांच्यावर हल्ला केला. अधिक तपास उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्थानिकांचे प्रश्न व समुद्रात मिळणारे पाणी वळविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा – जयंत पाटील

Next Post

नाशिक – नैराश्यातून वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन तरूणांची आत्महत्या

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिक - नैराश्यातून वेगवेगळ्या भागात राहणा-या तीन तरूणांची आत्महत्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011