व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Friday, December 1, 2023
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकसह राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस

India Darpan by India Darpan
August 29, 2020 | 9:35 am
in राज्य
0

नाशिक – शहरात पावसाने आज जोरदार हजेरी लावली आहे. तसेच, मुंबई व राज्याच्या अन्य भागातही पावसाचा जोर आहे. मुंबईतही येत्या चोवीस तासात हवामान ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईला पाणी पुरविणाऱ्या सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात आज जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे या तलावांत पाण्याची पातळी वाढत आहे. परिणामी पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे. सध्या सर्व तलावात एकूण १३ लाख ७७ हजार ६९० इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मुंबईकरांची वर्षभराची तहान आता भागल्यात जमा आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा हे दोन मोठे तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत.

पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनचं पावसानं सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे. सकाळी जोरदार तर आता मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत आहेत. सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. काही दिवसांत झालेल्या चांगल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातली जवळपास सर्वच लहानमोठी धरणं जवळपास शंभर टक्के भरली असून त्यातून विसर्गही सुरू आहे. वैतरणा आणि पिंजाळ या मुख्य नद्या ही मोठ्याप्रमाणात भरल्या आहेत. त्यांच्या पाणीपातळीत ही वाढ झाली आहे. मात्र या नद्यांनी त्यांची इशारा पातळी अजून ओलांडली नाही.

भंडारा जिल्ह्यात रात्रीपासूनच रिमझिम पाऊस सुरू असून अनेक रस्ते जलमय झाले आहेत. गेल्या २४ तासांत ८९.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गोसेखुर्द धरणाचे ३३ पैकी २२ दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात आले आहेत.

धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस झालेला नाही.  गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून त्यामुळे जनजीवन विस्कळित झालं असलं तरी जिल्ह्यातला कोणताही मार्ग बंद नाही.

अमरावती जिल्ह्यातही रात्रीपासूनच पाऊस असून सकाळपासून जोरदार पर्जनवृष्टी होत आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या कालावधीत  झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी शासनानं ६८ कोटी रुपययांचा निधी मंजुर केला. ही  नुकसान भरपाई मिळण्यासाठी जलसंपदा आणि  लाभक्षेत्र तथा कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता.

Previous Post

सातपूरमधील तीन मृतदेह अंत्यविधीसाठी वेटिंगवर; एकाच डिझेलवाहिनीवर मदार

Next Post

राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Next Post

राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींसाठी चांगला दिवस, आर्थिक लाभ..जाणून घ्या..शनिवार २ डिसेंबरचे राशिभविष्य

December 1, 2023

अजितदादांना दिला इतक्या किलोचा गुलाब पुष्प……थेट इंटर नॅशनल बुकमध्येच झाली नोंद..बघा नेमकं काय घडलं

December 1, 2023

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाची मदत केव्हा मिळणार ? मुख्यमंत्र्यांनी दिली ही माहिती

December 1, 2023

घरातल्या गोष्टी बाहेर सांगणे चांगल्या मुलाचे लक्षण नाही.. जयंत पाटील यांनी अजित पवारांचे नाव न घेता केली ही टीका

December 1, 2023

दिंडोरीत राष्ट्रवादीचा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढत शेतकरी आक्रोश मोर्चा

December 1, 2023

ग्रामपंचायत निवडणुकांचा खर्च पारंपरिक पद्धतीने सादर करता येणार.. ही आहे मुदत

December 1, 2023
  • Privacy Policy

India Darpan Live © 2023.

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

India Darpan Live © 2023.