रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नंदुरबारचा ऐतिहासिक सगर उत्सव यंदा प्रातिनिधीक स्वरुपात

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2020 | 8:35 am
in राज्य
0
FB IMG 1605155056466

नंदुरबार – संगणक आणि इंटरनेटच्या युगातही गवळी समाजात शेकडो वर्षापासून “सगर” उत्सव पशुधनाची परंपरा टिकून आहे. दरवर्षी दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव नंदनगरीचे आकर्षण असते. यंदा मात्र कोरोना संकटामुळे साध्या पद्धतीने म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात सगर उत्सव साजरा करण्याचा निर्णय समाज पंच मंडळाने घेतला आहे.
यंदाही सोमवारी (१६ नोव्हेंबर) दीपावली पाडवा व बलिप्रतिपदा निमित्त गवळी समाजातर्फे सगर उत्सवानिमित्त यमराजाचे वाहन रेडा व लक्ष्मी स्वरूप पाळीव गाई-म्हशींचे पुजन करण्यात  येणार आहे. समाजावर राज्यासह देशात अघटीत संकट येवू नये म्हणून यमराजाचे वाहन रेडा याचे पूजन केले जाते. तर लक्ष्मी स्वरूप गाई म्हशींची पूजा केली जाते. राज्यासह देशात ज्या ज्या ठिकाणी विविध धर्माचा गवळी समाज आहे तेथे दिवाळी सणाच्या काळात सगर उत्सव अर्थात रेड्यांसह गाई-म्हशींचे पूजनाला महत्त्व आहे.
FB IMG 1605155042628
वीरशैव लिंगायत गवळी समाज म्हैस व रेडाच्या माध्यमातून बंधुभाव जोपासण्यासाठी शेकडो वर्षापासूनची परंपरा आजही तग धरून आहे. दिवाळीत पाडव्याला एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव एकत्र जमतात. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगर अर्थात रेड्यांची मिरवणूक काढली जाते. म्हैस हे लक्ष्मीचे स्वरूप असून रेडा हे यमराजाचे वाहन आहे. त्यामुळे दिवाळीत आणि नवीन वर्षात कसलेही अघटीत संकट येऊ नये म्हणून यमराजाला खूष करण्यासाठी त्याचे वाहन असलेल्या रेड्याची दिवाळीला मनोभावे पूजा केली जाते.
याच बरोबर गवळी समाजाच्या दृष्टीने गाय आणि म्हैस ही लक्ष्मीचे रूप असल्याने घराघरात भरभराट व्हावी यासाठी दरवर्षी दिवाळीत गवळी समाजातर्फे म्हशीचे देखील पूजन करण्यात येते. गवळी बांधव आपापल्या म्हशी व रेड्यांच्या शिंगांना हिंगूळ व मोरपिसे तथा गळ्यात झेंडूच्या माळा लावून त्यांच्या अंगावर रंगबिरंगी झूली कोरून सजवतात .त्यानंतर सजविलेल्या मुक्या प्राण्यांना गवळीवाडा, बालवीर चौक, देसाईपुरा, अमृत चौक परिसरातून   नेण्यात येते. शहरातील मोठा मारुती मंदिराजवळील ऐतिहासिक सोनी विहिरीजवळ सगर उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
ऐतिहासिक परंपरा
धकाधकीच्या काळात सुद्धा गवळी समाज बांधवांनी बलिप्रतिपदा निमित्त सगर उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. ऐतिहासिक नंद गवळी राजा यांच्या नंदनगरीत भविष्यात देखील सगर उत्सव युवा पिढी सुरू ठेवेल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी दिली.
असा होईल उत्सव
सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सगर उत्सवास प्रारंभ होईल. याठिकाणी गवळी समाजातर्फे पंच मंडळी व मानकरी यांची उपस्थिती असते. सगर पूजनाच्या ठिकाणी रेडे सलामी देतात आणि म्हशी नतमस्तक होतात.  दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे रेडयांना लागणारी ढेप, चारा ,पशुखाद्य पुरेश्या प्रमाणात पुरवू शकत नाही. परिणामी गेल्या दोन-चार वर्षात शहरातील रेड्यांची संख्यादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. आजच्या स्थितीत बोटावर मोजण्या इतक्या गवळी समाज बांधवांकडे पाळीव प्राणी आहेत. वाढत्या महागाईमुळे रेड्यांचे पालन-पोषण करणे अवघड झाले आहे. मात्र तरीदेखील मुक्या प्राण्यांचा सगर उत्सव आणि शेकडो वर्षांची परंपरा नंदुरबारसह महाराष्ट्रातील गवळी समाज बांधवांनी कायम ठेवली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पाडव्यापासून उघडणार धर्मस्थळांचे दरवाजे; मुख्यमंत्र्यांचे दिवाळी गिफ्ट

Next Post

मदत वाटपात केंद्राचा भेदभाव; बंगालला सर्वाधिक तर महाराष्ट्राला अत्यल्प

Next Post

मदत वाटपात केंद्राचा भेदभाव; बंगालला सर्वाधिक तर महाराष्ट्राला अत्यल्प

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
202506143427942

नीट युजीचा निकाल जाहीर, राजस्थानचा महेश कुमार ६८६ गुणांसह अव्वल तर महाराष्ट्राचा हा विद्यार्थी तिसरा

जून 14, 2025
IMG 20250614 WA0223

पुणे शहर पोलीसांचे आता ‘पीटीपी ट्रॅफिकॉप ॲप’…वाहतूक कोंडी सोडवण्यासह या गोष्टींसाठी उपयोगी

जून 14, 2025
crime1

रिक्षा प्रवासात सह प्रवासी महिलांनी वृध्देच्या पाकिटातील १ लाख ४ हजाराचे दागिणे केले लंपास

जून 14, 2025
crime 88

घरफोडीचे सत्र सुरूच…चार घडफोडीमध्ये चोरट्यांनी सव्वा सात लाखाचा ऐवज केला लंपास

जून 14, 2025
jilha parishad

मालेगाव, सुरगाणा, चांदवडलाच का वाढले एकेक गट…जाणून घेऊया, कशी करतात गट संख्या निश्चिती

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011