सोमवार, जून 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिल्लीत खादीचा विक्रम; एवढ्या कोटींची विक्री

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2020 | 4:19 am
in संमिश्र वार्ता
0
image0011SWU

नवी दिल्ली – आर्थिक संकट आणि कोरोनाच्या भीतीवर मात करत सणासुदीच्या काळात खादी उत्पादनांच्या विक्रमी विक्रीमुळे खादी कारागिरांना चांगला फायदा झाला आहे. यावर्षी 2 ऑक्टोबरपासून, केवळ 40 दिवसांत खादीची एका दिवसातील विक्री , खादी इंडिया, या  कॅनॉट प्लेस, नवी दिल्ली  इथल्या  फ्लॅगशीप  अर्थात मुख्य भांडारातील येथे 1 कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

13 नोव्हेंबर रोजी, या भांडारात एकूण 1.11 कोटी रुपयांची विक्री झाली, ही यावर्षी नोंदवलेली एका दिवसातील सर्वोच्च विक्री आहे. टाळेबंदीनंतर पुन्हा व्यवसाय सुरु झाल्यानंतर खादीच्या विक्रीने यावर्षी गांधी जयंतीदिनी (2 ऑक्टोबर रोजी) 1.02 कोटी रुपयांचा टप्पा गाठला होता, त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी 1.05 कोटी रुपये आणि 7 नोव्हेंबर रोजी 1.06 कोटी रुपयांची विक्री झाली होती.

या भांडारातील खादीची आतापर्यंतची सर्वोच्च विक्री 1.27 कोटी रुपये 2 ऑक्टोबर 2019 रोजी नोंदवली होती. केव्हीआयसी अर्थात खादी  आणि ग्रामोद्योग आयोगाचे चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी, खादीची विक्रमी विक्री पंतप्रधानांनी ‘स्वदेशीचा’ विशेषतः ‘खादीचा’ वापर करण्याच्या आवाहनानंतर झाली असल्याचे सांगितले. खादी व ग्रामोद्योगाचा कणा असलेल्या कारागिरांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने खादी प्रेमी पुढे येत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होत आहे. संक्रमण परिस्थितीतही, खादी कारागिरांनी पूर्ण उत्साहाने उत्पादन सुरु ठेवले, त्याला देशवासियांनी त्याच उत्साहाने पाठिंबा दिल्याचे सक्सेना म्हणाले. आर्थिक संकटातही केआयव्हीसीने खादीच्या वाढीचा वेग कायम राखला आहे.

यावर्षी खादी उत्पादनांच्या प्रचंड विक्रीला अधिक महत्त्व आहे. कोविड-19 टाळेबंदीमुळे सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले होते, मात्र केव्हीआयसीने देशभर मास्क, हँडवॉश आणि सॅनिटायजरचे उत्पादन घेतले होते. टाळेबंदीमुळे खादी कारागिरांच्या उपजिविकेवर परिणाम झाला होता. मात्र, पंतप्रधानांनी केलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ च्या आवाहनामुळे खादी आणि ग्रामोद्योगाला नवसंजीवनी मिळाली.

image0023QAI

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – पुण्यात्मा यशवंत – भाग २

Next Post

दिवाळीत ७२ हजार कोटींची उलाढाल; स्वदेशी वस्तूंना मागणी

Next Post
EmYql14W4AAKAfd

दिवाळीत ७२ हजार कोटींची उलाढाल; स्वदेशी वस्तूंना मागणी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 41

चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी

जून 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, जाणून घ्या, सोमवार, १६ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
DEVENDRA

शाळा प्रवेशोत्सव…पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह मान्यवर करणार विद्यार्थ्यांचे स्वागत…

जून 15, 2025
cm eknath shinde 1 e1704958478974

जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना…

जून 15, 2025
Screenshot 20250615 200323 Collage Maker GridArt

इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ही माहिती….

जून 15, 2025
st bus

एसटी पास थेट शाळेत…महामंडळाची विशेष मोहिम

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011