कनाशीमध्ये पंचायत समिती उपसभापती विजय शिरसाठ यांनी मारली बाजी
कळवण – कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत भुसणी व तताणी ग्रामपंचायत बिनविरोध झाली, तालुक्यातील २७ ग्रामपंचायतच्या निवडणुका पक्षीय पातळीवर झाल्या नसल्या तरी महाविकास आघाडीच्या बाजूने ९० टक्के ग्रामपंचायतमध्ये कौल दिला असून आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौं जयश्री पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांना २९ ग्रामपंचायतमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे.
कनाशीत चुरशीचा सामना झाला,आमदार समर्थक कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ यांनी एकहाती सत्ता काबीज केली.शिरसाठ यांच्या सत्तेला सुरंग लावण्यासाठी जिल्ह्यातील विद्यमान व माजी लोकप्रतिनिधीने विरोधकांना आर्थिक पाठबळ दिले होते मात्र मतदारांनी चपराक दिली तेच ओतूरमध्ये देखील घडले.

विधानसभा निवडणुकीनंतर यंदा प्रथम झालेल्या स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील व काही बाह्य शक्तींनी गावपातळीवर खास कर्मचाऱ्यांची यंत्रणा राबवून गावपातळीवर आर्थिक देवाणघेवाणचा सामंज्यस करार केला त्याला ग्रामस्थांनी भीक घातली नाही. भाऊबंदकीच्या संशय कल्लोळ्यातील निवडणुकीला गटतट व पक्षीय रंग देऊन स्थानिक राजकारण गढूळ करण्याचा प्रयत्नांना ग्रामस्थांनी हाणून पाडला,त्यांचे पडसाद निवडणुकीच्या निकालातून उमटले.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीला राजकीय रंग देणाऱ्या नेत्यांना स्थानिक ग्रामस्थांनी चपराक देत गाव विकासाला साथ दिली.त्यामुळे तालुक्यात स्थानिक नेत्यांना चांगलीच चपराक बसली, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या छुप्या युतीला ग्रामस्थांनी नाकारले नवोदिताना संधी देऊन विद्यमान सदस्यांना व पॅनलच्या नेत्यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडले.
कळवण तालुक्यातील भुसणी व तताणी ग्रामपंचायत व २३ ग्रामपंचायतमधील ८४ जागा बिनविरोध झाल्या. २७ ग्रामपंचायतच्या १५९ जागांसाठी ३७६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, सर्वांनी जास्तीत जास्त मतदानावर भर दिल्यामुळे ३३२२८ मतदारापैकी २७७१५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून तालुक्यात ८४ टक्के मतदान झाल्यामुळे निवडणुकीचा निकालाने देखील अनेकांना धक्का दिला. जास्त मतदानाचा प्रस्थापिताना धक्का बसला.

कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ व कनाशीचे माजी सरपंच नितीन बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कनाशी ग्रामपंचायतने एकहाती सत्ता काबीज केली तर माजी सरपंच अंबादास देसाई यांना दोन जागांवर समाधान मानावे लागले, ओतूरमध्ये दिगंबर पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सत्ता काबीज केली तर माजी सरपंच रविकांत सोनवणे व अशोक देशमुख यांच्या युतीला नाकारले,अभोणा ग्रामपंचायतमध्ये सुनील खैरनार, राजेंद्र पवार, पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीता पवार, माजी सरपंच मीराबाई पवार, सुबोध गांगुर्डे यांचा ग्रामपंचायतमध्ये शिरकाव झाला तर कळवण बाजार समितीचे संचालक डी एम गायकवाड, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक एकनाथ गायकवाड, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज वेढणे, राष्ट्रवादीचे सोमनाथ सोनवणे यांचे बंधू पिंट्या सोनवणे यांना नाकारले, सप्तश्रुंगी गडावर संदीप बेनके, राजेश गवळी या युवा नेत्यांना ग्रामस्थांनी संधी दिली तर शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गिरीष गवळी यांना नाकारले, नांदुरीमध्ये भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सौं सोनाली जाधव यांना पराभवाचे धनी व्हावे लागले मोहमुख ग्रामपंचायत ताब्यात मिळविण्यात शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव व सरपंच विजय जाधव यांना यश आले.
कळवण तालुक्यातील निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे —
कनाशी ग्रामपंचायत –
रविंद्र सखाराम बहिरम, मीना यशवंत गावीत,किसन मोतीराम पवार,मीना बबलेश लांडगे,सुनीता नितीन बोरसे,प्रशांत गोविंद आघार,अशोक कृष्णा चौरे,संगीता उत्तम पवार,वैशाली विजय शिरसाठ, चंद्रकांत बापू जाधव,मंगला अंबादास देसाई, बंडू मोतीराम पवार,गुंताबाई काशिनाथ खैरे
अभोणा ग्रामपंचायत-
नामदेव बुधा जोपळे, बेबीबाई कारभारी गांगुर्डे, सुनील मनीराम खैरनार,सुनीता राजेंद्र पवार,भाग्यश्री चेतन बिरारी,राजेंद्रसिंग दौलतराव पवार,विजया दिलीप जाधव,तेजस्विनी स्वप्नील मुसळे, सुबोध दिपक गांगुर्डे, किरण भोलेनाथ जगताप, मीरा पप्पू वाघ, शंकर कडू पवार,मीरा रोहिदास पवार
सप्तश्रुंगी गड ग्रामपंचायत –
रमेश शंकर पवार,जयश्री धनेश गायकवाड,कल्पना रविकांत बर्डे,दत्तू प्रभाकर बर्डे,राजेश कारभारी गवळी,सुवर्णा जीवन पवार,संदीप शशिकांत बेनके,बेबीबाई गोविंदा जाधव,मनीषा मधुकर गवळी
पाळे बु ग्रामपंचायत –
दशरथ गंगा पवार,पुष्पा सतीश गायकवाड,कल्पना अविनाश देशमुख,नंदू गोविंद निकम,योगिता योगेश निकम,लता भगवान देशमुख,अभिमन उत्तम दाणी,सुदिन गोपाळसिंग परदेशीं,जनाबाई शिवाजी बर्डे
मोहनदरी ग्रामपंचायत –
गोकुळ रंगनाथ गवळी, प्रभावती प्रकाश भोये, दिपक सुरेश चव्हाण शांताराम पोपट चव्हाण, मंगला कैलास चव्हाण , कैलास लक्ष्मण चव्हाण, जयश्री कैलास चव्हाण, ताराबाई धनराज चव्हाण,शिवाजी देवराम चव्हाण, सुमन शांताराम भोये, चंद्रकला हिरामण बहिरम.
ओतुर ग्रामपंचायत –
मंगेश सुरेश देसाई, पवार मिराबाई सुकदेव पवार,
प्रतिभा दिगंबर पवार, दीपक प्रकाश आहिरे, दिपक जयराम माळी, पार्वत निवृत्ती गांगुर्डे,
ज्ञानेश्वर गोपीनाथ पवार सोनाली अशोक सोनवणे जान्हवी युवराज मोरे
मुळाने वणी ग्रामपंचायत –
शांताराम राजाराम ठाकरे,वंदना सोमनाथ तुंगार,पोपट वामन बागूल,अंजना राजेंद्र ठाकरे,पुष्पा किसन ठाकरे,काळू वाळू गावीत, मंदाबाई कृष्णा खिल्लारी
नरूळ ग्रामपंचायत –
महादू काशीराम चौधरी,अलका रमेश चौधरी,मोतीराम एकनाथ चौरे,सुनंदा कांतीलाल गवळी,योगिता राहुल भोये,मनोहर बाबुलाल भोये,पांडुरंग सोमा ठाकरे,अनिता भरत गायकवाड,दिनेश देविदास पवार,प्रमिला विश्वनाथ भोये,गंगाबाई माधवराव दळवी
मेहदर ग्रामपंचायत –
चंद्रकांत काशीराम बागूल,सिंधूबाई वसंत जोपळे,प्रकाश हेमंत बंगाळ,शहाणू देवराम राऊत,रविना भारत आंबेकर,रामदास सीताराम बंगाळ,प्रमिला विलास बंगाळ
कळमथे ग्रामपंचायत –
शशिकांत पांडुरंग आहेर,जयश्री खंडू गोधडे,अप्पा दाजीबा वाघ,सिंधूबाई अरुण वार्डे,सुरेखा नितीन वाघ,अरुण गुलाब वार्डे,मनीषा गौरव वाघ
विरशेत ग्रामपंचायत –
संजय रामदास बागूल,वासुदेव सुकराम वाघमारे,राधाबाई किसन जोपळे,शिवदास मन्साराम गवळी,राधा विजय गवळी,वनिता रामू गवळी,रमेश पांडुरंग कुवर,माधुरी दिलीप गवळी,मनीषा साहेबराव गावीत
वडाळे हातगड ग्रामपंचायत –
राजू भावराव गावीत,प्रकाश दिलीप पवार,सुवर्णा जयराम गावीत,पुंडलिक महादू देशमुख,लता धनराज गावीत,विमल वसंत गावीत,चंद्रकांत पंडीत बागूल,लता धनराज गावीत,दीपिका गोवर्धन गांगुर्डे
नांदुरी ग्रामपंचायत –
किरण पुंडलिक अहिरे,सुभाष भाऊराव राऊत,दीपाली लखन गांगुर्डे,ताराचंद पोपट चौधरी, नंदाबाई गंगाधर भोये,माधुरी नितीन राऊत,प्रकाश देवाजी राऊत,मंगला दत्तू महाले,सुलोचना बाबुराव कानडे
ओझर ग्रामपंचायत –
गुलाब लहानू खिल्लारी,धनश्री अंबादास भोये,रमेश हिरामण भोये,सोनाली दत्तात्रेय भोये,सोनाली भगवान खिल्लारी,जयवंत निंबा मोरे,सुमनबाई देविदास पानसरे
काठरे दिगर ग्रामपंचायत –
मोहन उलशा चौधरी,भिवराज शिवाजी बागूल,चंद्रकांत पंत पालवी,विजय गुलाब गांगुर्डे,रत्नाबाई परशराम भोये,सुशीला शिवराम पवार,भवान नानाजी आहेर,विमल लक्ष्मण बर्डे
बिलवाडी ग्रामपंचायत –
दीपक काशिनाथ भोये,मोहिनी लक्ष्मण साबळे,माधव यशवंत गायकवाड,भारती अशोक गायकवाड,मंदाकिनी गणेश गायकवाड,ढवळू गुणाजी पवार,वैभवी काशिनाथ बागूल
बापखेडा ग्रामपंचायत –
प्रभू काळू जाधव,राजश्री कैलास बागूल,उर्मिला सुरेश गायकवाड,योगिता मुरलीधर चौरे,सुरेश एकनाथ जोपळे,नामदेव काशीराम पाडवी,सुमन भास्कर गावीत,जयश्री सूकरा साबळे,कांतीलाल तुळशीराम लांडगे,सुनील यशवंत चौधरी,भारती बाजीराव गायकवाड
बोरदैवत ग्रामपंचायत –
विठोबा संपत चव्हाण,कविता सीताराम चव्हाण,रामदास सयाजी गावीत,मेघा साहेबराव चव्हाण,पूनम प्रकाश चव्हाण,यशवंत अनाजी चव्हाण,सोनी भाऊराव बागूल
गोसराणे ग्रामपंचायत –
संजय गोपीनाथ साबळे, मुरलीधर आनंदा मोरे,रजनी रामा गांगुर्डे,रमण पांडू बहिरम,अरुणा विठ्ठल साबळे,मालती मधुकर भदाणे,कैलास हरी थैल,निंबाबाई यशवंत अहिरे,मालती मधुकर भदाणे
भगुर्डी ग्रामपंचायत –
दत्तात्रेय पंडीत गवळी,होनाजी शिवराम चव्हाण,कल्पना भास्कर गांगुर्डे,विलास लक्ष्मण भोये,सुनीता राजू गायकवाड,आशा संजय देवरे,सुरेश रायाजी बहिरम,विमल नारायण बहिरम,कमल अशोक पवार
मोहमुख ग्रामपंचायत –
बापू पोपट ठाकरे, अनिता काळू ठाकरे,रुख्मिणी संजय साबळे,पंडीत गंगाराम गायकवाड,वैशाली बाळासाहेब गायकवाड,लता सचिन कवर,बाळू पोपट गायकवाड,भगवान निंबा जाधव,रुक्मिणी विजय जगताप
लिंगामा ग्रामपंचायत –
गुलाब परशुराम पालवी,कांतीलाल यशवंत गवळी,सविता अरुण पालवी,देवराम लक्ष्मण पालवी, ज्योती माधव पालवी,मनीषा वामन भोये,राजू रामदास पवार,ज्योती माधव पालवी,राधबाई नामदेव पालवी
जामले वणी ग्रामपंचायत –
देविदास मनोहर गांगुर्डे,दिलीप उत्तम गांगुर्डे,विमलबाई सोनिराम गांगुर्डे,धनराज काळू ठाकरे,ललिता नामदेव शिरसाठ,सीमा कृष्णा ठाकरे,भास्कर लक्ष्मण कवर,ललिता नामदेव शिरसाठ,सीमा कृष्णा ठाकरे
पळसदर ग्रामपंचायत –
विजेंद्र भावराव कवर,मीना भास्कर कवर,योगिता धनराज कवर,छबूनाथ काशिनाथ कवर,एकनाथ तुळशीराम कवर,उज्वला रामराव कवर,ज्ञानेश्वर गंगाराम कवर,सिंधूबाई जयराम कवर,रंजना सुधाकर जाधव
सावकी पाळे ग्रामपंचायत –
एकनाथ लक्ष्मण बंगाळ, सुमित्रा नवीन बंगाळ,
निलेश पंढरीनाथ गवळी,रेखा राजाराम गायकवाड,आशा शंकर ढुमसे,ताराचंद सोनू बंगाळ, सुनीता रविंद्र बंगाळ
कुंडाणे (क )ग्रामपंचायत
सम्राट चिंतामण गांगुर्डे, लता मोहन ठाकरे,गौरी जितेंद्र ठाकरे,संजय रामजी गांगुर्डे,सोनाली रामदास जगताप,मीनाक्षी गुलाब ठाकरे,देवेंद्र सुमतीलाल ढुमसे,देविदास जयराम भोये,जयश्री नाना ढुमसे
देवळी वणी ग्रामपंचायत –
भरत गणपत चव्हाण,योगिता हेमराज गवळी,अनुसयाबाई विठोबा चव्हाण,लताबाई अंबादास चव्हाण,रंजना रमेश चव्हाण,हेमराज कृष्णा चव्हाण,धवळू धनजी चव्हाण,पंकज मनोहर चव्हाण,वंदना सोमनाथ गवळी
