मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इगतपुरी – नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ, चार महिन्यात चार बळी, आंदोलनाचा इशारा

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2020 | 5:03 pm
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक : इगतपुरी तालुक्यात गेल्या ४ महिन्यापासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आता पर्यंत  ४ जणांचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला. २ दिवसांपूर्वी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच अधरवड येथे ३ वर्षीय बालिकेचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना ताजी असतांनाच गुरुवारी दि. १९ ला सायंकाळी ६ च्या सुमाराला पिंपळगाव मोर येथील ६ वर्षीय बालकाचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला. यामुळे परिसरात तीव्र घबराट पसरली आहे. लोकांमध्ये संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
या भागातील वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक आदींची तातडीने उचलबांगडी करावी, युद्धपातळीवर प्रशिक्षित वन अधिकाऱ्यांचे पथक बोलवून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी केली आहे. उपवनसंरक्षकांना याबाबत निवेदन देण्यात येणार असून मागण्या पूर्ण न झाल्यास आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की इगतपुरी तालुक्यात गेल्या ४ महिन्यापासून नरभक्षक बिबट्या सक्रिय झाला आहे. ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अधरवड येथील ३ वर्षीय बालिकेचा नरभक्षक बिबट्याने बळी घेतला. ही घटना ताजी असतांनाच आज गुरुवारी पिंपळगाव मोर येथील भैरवनाथ मंदिर भागातून नरभक्षक बिबट्याने १० वर्षीय बालकाचा बळी घेतला. यामुळे इगतपुरी तालुक्यात निष्क्रिय वन अधिकाऱ्यांबाबत तीव्र स्वरूपाचे संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासह मोठ्या प्रमाणावर घबराट पसरून लोकांमध्ये नरभक्षक बिबट्याची दहशत पसरली आहे.
श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे सांगितले की, इगतपुरी तालुक्यासह या  भागातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नरभक्षक बिबट्या प्रकरणी कोणताही गम ना पस्तावा नसल्याचे गंभीर चित्र आहे. गेल्या आठवड्यातच नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यासाठी उपाययोजना अपेक्षित असतांना निष्क्रियता असल्याने बालकाचा नाहक बळी गेला. या भागात माणसाच्या रक्ताला चटावलेला बिबट्या असल्यानेच एकामागोमाग बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. या भागातील वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक यांचा या भागात कोणताही संपर्क नसून त्यांचे मोबाईल कायमच बंद असतात. त्यामुळे लोकांच्या संतापात भर पडली आहे. वन अधिकारी आणि वनरक्षक कायमच नशेत राहत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रशिक्षित वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या झालेल्या असल्याने सध्या ह्या भागात सावळागोंधळ वाढतच आहे. कार्यरत असलेले वन अधिकारी आणि कर्मचारी अप्रशिक्षित असून नेमके कोण वनरक्षक येथे काम करतात हे कोणालाही माहीत नाही. अनेक वर्षांपासून एकच कर्मचारी या भागात ठाण मांडून बसले आहे. वरिष्ठांच्या आशीर्वादाने बदल्यांचे नियम गुंडाळून सुरू असलेले चक्र आता लोकांच्या जीविताला धोका निर्माण करीत आहे. त्यामुळे इगतपुरी तालुक्यात वनविभाग अस्तित्वात आहे की नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या भागातील वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करून नरभक्षक बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा यासह विविध मागण्यांचे निवेदन नाशिकच्या उपवनसंरक्षकांना देण्यात येणार आहे.

असंवेदनशील वन अधिकारी आणि कर्मचारी
वन विभागाच्या असंवेदनशील वन अधिकारी आणि कर्मचारी बळी गेलेल्या कुटुंबाला कुठलाही दिलासा देण्यात सपशेल अपयशी ठरले. नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांना योग्य उपचार देण्यात आले नाहीत. कुठलाही अधिकारी कर्मचारी रुग्णालयात भेटीला न जाता कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानतात. मयताच्या अंत्यविधीमध्येही हे लोक सहभागी झाले नाही.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकहून बंगळुरू अवघ्या तासाभरातच; स्पाईसजेटच्या विमानसेवेचा शुभारंभ

Next Post

आजचे राशीभविष्य – शुक्रवार – २० नोव्हेंबर

Next Post

आजचे राशीभविष्य - शुक्रवार - २० नोव्हेंबर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करणासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011