मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आजचे राशीभविष्य – मंगळवार – १७ नोव्हेंबर २०२०

by India Darpan
नोव्हेंबर 17, 2020 | 1:01 am
in भविष्य दर्पण
0

आजचे राशीभविष्य – मंगळवार – १७ नोव्हेंबर २०२०
मेष- मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या
वृषभ- भावनिक ताळमेळ तारेवरची कसरत
मिथुन- फायद्याची गुंतवणूक
कर्क- वाहन सांभाळा
सिंह- धार्मिक सहल
कन्या- गुडघ्याचे दुखणे सांभाळा
तूळ- शब्द हेच शस्त्र सांभाळून वापरा
वृश्चिक- गैरसमज नकोत- लॉन्ग टाइम लॉजिक हवे
धनु- भावनिक गुंतवणूक विचारपूर्वक करा
मकर- ज्येष्ठांचे आजारपण
कुंभ- व्यवसायिक टाइमिंग साधा
मीन- टुरिझम सप्ताह
………
शंकासमाधान
प्रश्न- प्रभाकर – राहू- केतू पौराणिक कथा काय आहे?
उत्तर- हिरण्यकश्यपुची बहिण सिहीका व वीप्रचिती यांचा पुत्र म्हणजे राहू. राहुला शंभर भाऊ होते. त्यापैकी सर्वात ज्येष्ठ राहू. राहू हा मंडलाकार असल्याने त्याला ब्रह्मा व इंद्राच्या सभेत मानाचे स्थान होते. सुरुवातीपासूनच राहूचे सर्वच मुख्य  ग्रहाबरोबर वैर होते. आत्मारुपी सूर्य म्हणजे रवी व मन रूपातला चंद्र याला ग्रहण लावण्याचे काम राहू नियमित करतो. राहू जन्मताच फनीधर या नागाच्या स्वरूपात जन्मला त्याला काळसर्प असे म्हणतात. तो एक इच्छाधारी नाग होता. समुद्रमंथनातून मिळालेले अमृत सर्व देवता फक्त पिऊन टाकतील अशा विचाराने राहू देव रूपात देवतांच्या रांगेत बसून अमृत प्राशन केले. देवरूप धारण केलेल्या दैत्य राहुला अमृतप्राशन करताना सूर्य तसेच चंद्राने ओळखले. ही गोष्ट त्यांनी विष्णूचा लक्षात आणून दिली. विष्णूने तात्काळ सुदर्शन चक्राने राहूचा शिरच्छेद केला त्यातील शिराचा भाग राहु बनला तर अर्धा भाग समोर उडून केतू बनला. त्यामुळेच कुंडलीत नवग्रह मांडताना राहूच्या बरोबर सप्तमात म्हणजे समोर केतूचे स्थान असते. चंद्र सूर्यामुळे आपली अशी अवस्था झाली. यामुळे राहू हा सूर्य व चंद्राला ग्रहण लावतो. म्हणजेच कुंडलीतील सुर्य राहु युती तसेच चंद्र राहु युती ही अनिष्ट मानले जाते.
राहू हा भगवान शंकराच्या  अधिकारातील गणितज्ञ तसेच यंत्री म्हणजे आजचा इंजिनियर होता. त्यामुळेच ज्यांच्या कुंडलीत राहु शुभकारक असतो ते लोक गणितात किंवा ख्यातनाम इंजिनिअर असतात. राहू  द्वितीय पंचम अथवा  एकादश ठिकाणी असल्यास व शुभयोगात असल्यास असा मनुष्य राजकारणात विविध पदांवर यशस्वी होतो. ज्योतिषशास्त्रात राहू व केतू ला आकाशस्थ ग्रह  न मानता उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या छाया स्वरूप मानले आहे त्यामुळेच कुंडलीमध्ये राहू व केतू 180 अंश म्हणजे एकमेकांच्या समोर असतात. कुंडलीतील बारा  भावांपैकी ज्या ठिकाणी राहू व केतू समोरासमोर येतात असे बारा प्रकारचे कालसर्प योग अथवा दोष यांचे वर्णन शास्त्रात आढळते. राहू व केतू हे जरी मुख्यता अडथळा आणणारे ग्रह आहेत असा समज असला तरी शल्यचिकित्सा, अभियांत्रिकी, आकडेमोड, नवनवीन उद्योग, निर्माण करण्याचे धाडस, खाणकाम, विद्युत उपकरणे निर्मिती, सत्ताकारण, शेअर मार्केट, औषध उत्पादन, चिकित्सा विज्ञान यामध्ये राहु व केतु च्या शुभयोग यामुळेच चौफेर यश मिळते. असे शास्त्रात सांगितले आहे….
आजचा राहू काळ
दुपारी तीन ते साडेचार आहे.
dinesh thombare e1599484239390
पंडित दिनेश पंत
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

सदर लेखमाला

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी – सर्पमित्राने दिले जखमी नागाला व दुर्मिळ गव्हानी घुबडास जीवनदान

Next Post

श्यामची आई संस्कारमाला – पुण्यात्मा यशवंत – भाग २

Next Post
19

श्यामची आई संस्कारमाला - पुण्यात्मा यशवंत - भाग २

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011